
सामना ऑनलाईन ।कोलकाता
हिंदुस्थानच्या खेळाडूंनी आशियाई कप जागतिक रँकिंग तिरंदाजी स्पर्धेत दमदार कामगिरी करीत चार पदकांसह पदकतालिकेत इराणसह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. वादळ येण्याचे संकेत मिळाल्यामुळे चार दिवस रंगणारी ही स्पर्धा दोन दिवसांतच आटोपण्यात आली. यजमान दक्षिण कोरियाने पहिले व चीन तैपेईने दुसरे स्थान पटकावले.
हिंदुस्थानच्या खेळाडूंनी या स्पर्धेत तीन रैप्य व एक कास्य पदकांसह चार पदकांवर नाव कोरले. वैयक्तिक प्रकारात पदक जिंकणारी दिव्या धयाल ही एकमेव हिंदुस्थानी खेळाडू ठरली हे विशेष. महिलांच्या कंपाऊंड प्रकारात तिने रौप्य पदक जिंकले.
शुकमनी बाब्रेकर, धीरज बोमदेवरा यांनी पुरुषांच्या गटातील रिकर्व्ह प्रकारात रौप्य पदक जिंकले. तसेच रिद्धी व शुकमनी बाब्रेकर यांना मिश्र गटातील रिकर्व्ह प्रकारात रौप्य पदकावर हक्क सांगता आला. शिवाय रिद्धी, राजेंद्र साक्षी व प्राची सिंग यांनी महिला गटातील रिकर्व्ह प्रकारात कास्य पदक जिंकले. या स्पर्धेत हिंदुस्थानचा १६ जणांचा चमू होता.

























































