हिंदुस्थानच्या हॉकी संघांचा धमाका, टोकियो ऑलिम्पिकमधील प्रवेशाच्या दिशेने कूच

379

हिंदुस्थानच्या दोन्ही हॉकी संघांनी शुक्रवारी धडाकेबाज खेळ करून टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश करण्याच्या दिशेने पाऊल टाकले. एकीकडे पुरुषांच्या संघाने रशियाला 4-2 अशा फरकाने तर दुसरीकडे महिलांच्या संघाने अमेरिकेला 5-1 अशा फरकाने धूळ चारून पात्रता फेरीचा पहिला ‘अंक’ आपल्या नावावर केला. आता उद्या पात्रता फेरीची दुसरी लढत रंगणार आहे.

महिला लढतीत 29 व्या मिनिटाला लिलिमा मिंझ हिने दमदार गोल करून हिंदुस्थानला आघाडी मिळवून दिली. 40 व्या मिनिटाला शर्मिला देवीने, 42 व्या मिनिटाला गुरजीत कौरने, 46 व्या मिनिटाला नवनीत कौरने आणि 51व्या मिनिटाला पुन्हा गुरजीत कौरने शानदार गोल केले. पुरुषांच्या गटात हरमनप्रीत सिंग, मनदीप सिंग व एस. व्ही. सुनील यांनी गोल करून हिंदुस्थानला विजय मिळवून दिला.

आपली प्रतिक्रिया द्या