चायना ओपन बॅडमिंटन; हिंदुस्थानचे आव्हान संपुष्टात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । चांग्झू

हिंदुस्थानची शटल क्वीन पी. व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांना चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागल्याने हिंदुस्थानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. सिंधूवर चीनच्या चेन युफेईने 21-11, 11-21, 21-15 असा संघर्षपूर्ण विजय मिळवला तर दुसरीकडे श्रीकांतने जपानच्या केंटो मोमोटा समोर अवघ्या 24 मिनिटांत 9-21, 11-21 अशी शरणागती पत्करली.

लय हरवली
महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत पी. व्ही. सिंधूने पहिला गेम 11-21 ने गमावल्यानंतर दुसरा गेम 21-11 ने जिंकत सामना निर्णायक गेममध्ये नेला होता. मात्र सिंधूची लय हरवली आणि चेन युफेईने गेमसह सामना जिंकला.

निष्प्रभ
तत्पूर्वी झालेल्या पुरुष एकेरीच्या सामन्यात हिंदुस्थानच्या किदाम्बी श्रीकांतला उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत पराभव पत्करावा लागल्याने स्पर्धेतील त्याचे आव्हान संपुष्टात आले. जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या श्रीकांतला दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जपानच्या केंटो मोमोटाने 21-9, 21-11 असे सरळ गेममध्ये सहज पराभूत केले.

दुसऱ्या विजेतेपदाचे स्वप्न भंगले
उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत 24 वर्षीय श्रीकांतकडे जपानी खेळाडूच्या फटक्यांना उत्तर नव्हते. एकतर्फी झालेल्या या लढतीत श्रीकांतने अवघ्या 24 मिनिटांत मोमोटासमोर शरणागती पत्करली. या पराभवामुळे स्पर्धेच्या विजेतेपदावर दुसऱयांदा नाव कोरण्याचे श्रीकांतचे स्वप्न उद्ध्वस्त झाले.

summary- india lost all in china open badminton