पाकिस्तानने ज्या तुर्कीये कंपनीच्या ड्रोनने हिंदुस्थानवर केला होता हल्ला, त्याच कंपनीला भोपाळ-इंदोर मेट्रोचे कंत्राट

पाकिस्ताने ज्या ड्रोन्सने हिंदुस्थानवर हल्ला केला होता. ते ड्रोन्स तुर्कीयेच्या एका कंपनीने बनवले होते. आता याच कंपनीला मध्य प्रदेशच्या मेट्रोच्या कामाचे कंत्राट मिळाले होते. ही बाब सरकारला कळताच हे कंत्राट रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

भोपाळ आणि इंदोरमध्ये मेट्रोसाठी असिस गार्ड ही कंपनी ऑटोमॅटिक फेयर कलेक्शन गेट्स बनवत आहेत. पण पाकिस्तानने 9 आणि 10 मे रोजी हिंदुस्थानवर ड्रोन हल्ले केले होते. या हल्ल्यात जे ड्रोन वापरले गेले ते तुर्कीच्या असिस गार्ड याच कंपनीने बनवले होते. केंद्र सरकारने याबाबत माहिती दिली होती. तुर्की सैन्याचा हा पहिला ड्रोन असून पाकिस्तानने हिंदुस्थानी सीमेजवळून या ड्रोनवरून हल्ला केला होता.

आता मध्य प्रदेशचे मंत्री कैलास विजयवर्गीय यांनी या बाबत दखल घेतली आहे. देशापेक्षा काहीच मोठं नाही असे म्हणत त्यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. जर ही कंपनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे हिंदुस्थानविरोधी कारवायात सामील असल्याचे कळाले तर या कंपनीला निर्बंध लादले जातील असे विजयवर्गीय म्हणाले आहेत.

मेट्रो रेल कॉर्पोरेशनने असिस गार्ड कंपनीशी 2024 साली करार केला होता. असिस गार्ड ही तुर्कीयेमधली कंपनी असून ड्रोनसह इतर उपकरणाची निर्मिती या कंपीनीतून होते. हे उपकरण देशाच्या सीमेवर वापरले जातात.