जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेशमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

उत्तरेकडील राज्यात 11 मे पासून 15 मे पर्यंत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचबरोबर जम्मूकश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंड येथील डोंगराळ भागातही पाऊस कोसळणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. तसेच पश्चिम बंगाल आणि सिक्कीमध्ये 12 मे आणि 13 मे रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पूर्वेकडील राज्यातही 12 मे पासून 16 मे पर्यंत वादळी वाऱ्याबरोबर पाऊस कोसळणार असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याचे डीडीजीएम बी पी यादव यांनीही उत्तर पश्चिम हिंंदुस्थानमध्ये हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच या हवामान बदलामुळे सखल व डोंगराळ भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. यात प्रामुख्याने राजस्थान पासून पंजाब, हरयाणा, दिल्ली,उत्तरेकडील हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, आणि जम्मू कश्मीर यांचा समावेश आहे.