हिंदुस्थानची सागरी ताकद वाढणार; दूर अंतरावर झेपावणाऱ्या क्षेपणास्त्राची निर्मिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चीन आणि पाकिस्तानच्या नौदलाची वाढती ताकद आणि सागरी मार्गावरील धोके लक्षात घेता नौदलासाठी केंद्र सरकार हायटेक क्रुझ क्षेपणास्त्र बनविण्याच्या तयारीत आहे. सुमारे एक हजार किलोमीटरपर्यंत समुद्रातून जमिनीवर हल्ला करण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्र्ााचा वापर ब्राह्मोसमधून होणार आहे. संपूर्ण पाकिस्तान आणि हिंदुस्थानी सीमेजवळ असलेला चीनचा भूभाग बेचिराख करण्याची क्षमता या क्षेपणास्त्र्ाामध्ये आहे.

ब्राह्मोसच्या लॉन्चरला आतापर्यंत 30 जहाजांमध्ये वापरण्यात आले असून हे नवीन क्षेपणास्त्र्ाही ब्राह्मोस लॉन्चरमधून डागण्यात येणार आहे. या क्षेपणास्त्र्ाात सबसोनिक गतीमध्ये उड्डाण भरण्याची क्षमता आहे. नौदलाने अशा प्रकारच्या क्षेपणास्त्र्ााची मागणी केली होती. त्यानुसार डीआरडीओ या क्षेपणास्त्र्ााची निर्मिती करीत आहे. पुढील दोन महिन्यांत या प्रकल्पाला मंजुरी मिळण्याची शक्यता असून वर्ष 2023 पर्यंत क्षेपणास्त्राची पहिली चाचणी पार पडणार आहे.

200 क्षेपणास्त्र्ाांसाठी सुमारे 5 हजार कोटी खर्च

हे क्षेपणास्त्र्ा लवकरात लवकर नौदलाच्या ताफ्यात दाखल व्हावे, अशी नौदल प्रमुख ऍडमिरल करमवीर सिंह यांची इच्छा आहे. या क्षेपणास्त्र्ााची चाचणी पूर्ण झाल्यावर नौदल 200 क्षेपणास्त्र्ाs खरेदी करणार असून त्यासाठी सुमारे 5 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.