
हिंदुस्थानच्या तपास यंत्रणेला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठं यश मिळाले आहे. हरयाणा पोलीस आणि तपास यंत्रणांनी दोन मोस्ट वॉण्टेड गॅंगस्टर वेंकटेश गर्ग याला जॉर्जिया येथून आणि बिश्नोई गॅंगचा सदस्य असलेला भानू राणा याला अमेरिकेतून अटक करण्यात आली आहे. लवकरच दोघांना हिंदुस्थानकडे प्रत्यार्पण करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
हिंदुस्थानातील जवळवास चोवीसहून अधिक गॅंगस्टर देशाबाहेर आहेत. नव्या लोकांना त्यांच्या गॅंगमध्ये सामावून अपराध करत आहेत. तपास यंत्रणेनुसार गॅंगस्टर विदेशात बसून हिंदुस्थानात गुन्हे घडवत आहेत. त्यामध्ये गोल्डी बराड, कंपिल सांगवान, अनमोल बिश्नोई, हॅरी बॉक्सर, हिमांशू भाऊ सारख्या नावांचा समावेश आहे. हे गॅंगस्टर पोर्तुगाल. कॅनडा, अमेरिका, इंग्लंड आणि आखाती सारख्या देशांमध्ये सक्रिय आहेत आणि हिंदुस्थानात गुन्हेगारीची मुळे घट्ट करत आहेत.




























































