देशातील पहिली ओमिक्रॉन बुस्टर लस पुण्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यातील जेनोवा बायोफार्मास्युटिकल्स कंपनीने जेमकोव्हॅक ओएम ही ओमिक्रॉनवरील देशातील पहिली बुस्टर लस विकसित केली आहे. एमआरएनए आधारित ही लस असून तिला भारतीय औषध नियंत्रण महासंचालकांनी मंजुरी दिली आहे. कोव्हिशिल्ड अथवा कोव्हॅक्सिन ही लस घेतलेल्या व्यक्तींना ही लस घेता येणार असल्याचे सांगण्यात आले.