कांदा भाववाढीने वाहन व्यवसायाला संजीवनी

416

पितृपंधरवडा संपताच पहिल्या माळेला शेतकरी बांधवांनी शेतीउपयोगी ठरणारे ट्रक्टर, अनपेक्षित व अतिरिक्त उत्पन्नामुळे दुचाकी व चारचाकी वाहने खरेदी करून मंदीतही मोठी आर्थिक उलाढाल केली आहे. एकाच दिवशी 51 ट्रॅक्टर्स विकले गेल्याचे, तर महिनाभरात 225 ट्रक्टर विकले गेल्याने शेतकऱयांना सुगीचे दिवस आल्याचे बोलले जात आहे. महिनाभरात कांद्याला 3 हजार ते 4500 रुपयांपर्यंतचा भाव मिळाल्याने बळीराजा सुखावला आहे. कळवण, देवळा, बागलाण, चांदवड परिसरातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

जागतिक मंदीचा फटका बसून वाहन उत्पादन धोक्यात आल्याचे चित्र असतांना कळवणसारख्या तालुक्यातील शेतकरीवर्गाकडून नवरात्रोत्सवात मोठी आर्थिक उलाढाल झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या