हिंदुस्थान-पाकिस्तान लढतीची तिकिटे 3 सप्टेंबरपासून मिळणार

हिंदुस्थानात होणाऱया एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे नगारे आता वाजायला सुरुवात झाली आहे. 5 ऑक्टोबरपासून आयसीसीच्या या सर्वोच्च क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. हिंदुस्थानपाकिस्तान या कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील लढत 14 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या हायव्होल्टेज सामन्याची तिकिटे 3 सप्टेंबरपासून ऑनलाईन बुक करता येणार आहेत. विश्वचषक स्पर्धेची तिकिटे
25 ऑगस्टपासून उपलब्ध होणार आहेत. अंतिम टप्प्यातील तिकिटे 5 सप्टेंबरपासून मिळणार आहेत. हिंदुस्थानपाकिस्तान सामन्याची तिकिटे विकण्याचा अधिकारबुक माय शोकंपनीला मिळण्याची शक्यता आहे.