India Pakistan Tensions – पाकला मदत करणाऱ्या तुर्कीला झटका, हिंदुस्थानने Celebi कंपनीची विमानतळांवरील संपूर्ण सेवा केली रद्द

हिंदुस्थानने तुर्की विरुद्ध मोठी कारवाई केली आहे. राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेत नागरी हवाई सुरक्षा ब्युरोने तुर्कीची कंपनी सेलेबीची सेवा रद्द केली आहे. सेलेबी कंपनीची हिंदुस्थानमधील विमानतळांवरील संपूर्ण सेवा रद्द करण्यात आली आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूर राबवले आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली. यानंतर पाकिस्तानने हिंदुस्थानवर हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, हिंदुस्थानने पाकचा हल्ला परतवून लावला. त्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तान विरोधात सैन्य कारवाई सुरू केली होती. यादरम्यान तुर्कीने पाकला मदत करत हिंदुस्थानवर हल्ल्यासाठी ड्रोन पुरवले होते. याची गंभीर दखल हिंदुस्थानने घेतली आहे. आणि राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत तुर्कीच्या सेलेबी कंपनीची सेवाच रद्द केली आहे. तुर्कीची सेलेबी कंपनी हिंदुस्थानातील मुंबई, दिल्लीसह 8 मोठ्या विमानतळांवर सेवा देत होती.

आई विनवण्या करत होती शरण जा, त्याने ऐकलं नाही; त्राल चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याचा व्हिडिओ व्हायरल

सेलेबी कंपनी मुंबई विमानतळावर जवळपास 70 टक्के ग्राऊंड हँडलिंगचे काम करत होती. यात प्रवासी सेवा, लोड नियंत्रण, उड्डाणाचे संचालन, कार्गो आणि टपाल सेवांसह गोदाम आणि पूल संचालनाचीही कामे होती. सेलेबी कंपनीची हिंदुस्थानमधील सेवा रद्द करण्यात येत असल्याचे पत्र नागरी हवाई सुरक्षा ब्युरोने जारी केले आहे.

India-Pakistan Tension – ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी! अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याची सडकून टीका