
लोकसंख्येच्या बाबतीत हिंदुस्थान जगात भारी ठरला असून, चीनला मागे टाकले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या लोकसंख्या निधीच्या (यूएनएफपीए) आकडेवारीनुसार जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश हिंदुस्थान आहे. हिंदुस्थानची लोकसंख्या 142 कोटी 86 लाख तर चीनची 142 कोटी 57 लाख आहे. दरम्यान, जगाची लोकसंख्या 800 कोटी आहे म्हणजे जगात प्रत्येक पाच व्यक्तींमागे एक हिंदुस्थानी आहे.
2023 मध्ये हिंदुस्थान सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनेल, असे भाकीत ‘यूएनएफपीए’ने यापूर्वीच वर्तविले होते, ते आता खरे ठरले आहे. चीनच्या तुलनेत हिंदुस्थानात लोकसंख्या वाढीचा वेग जास्त आहे. एका वर्षात 1.56 टक्क्यांनी लोकसंख्या वाढली आहे.
हिंदुस्थानची लोकसंख्या 142 कोटी 86 लाख तर चीनची 142 कोटी 57 लाख आहे. चीनपेक्षा हिंदुस्थानची लोकसंख्या 29 लाखांनी जास्त आहे. चीनच्या लोकसंख्येत पहिल्यांदाच घट दिसून आली. तेथे जन्मदर एवढा कमी झाला की तो मायनसमध्ये नोंदविला गेला आहे.
ठळक बाबी
- चीनमध्ये सरासरी आयुर्मान हिंदुस्थानपेक्षा चांगले आहे. पुरुषाचे सरासरी वय 76 तर महिलांचे सरासरी वय 82 वर्षे आहे.
- याउलट हिंदुस्थानात पुरुषांचे सरासरी वय 74 वर्षे आणि महिलांचे 71 वर्षे आहे.
- हिंदुस्थानात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे, पण चीनमध्ये तसे नाही. चीनमध्ये वृद्धांची संख्या सर्वाधिक असून 20 कोटी लोक हे 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत.
- जगात 800 कोटी लोक आहेत. म्हणजे जगात प्रत्येक पाचवा व्यक्ती हिंदुस्थानी आहे.
2050 मध्ये हिंदुस्थानची लोकसंख्या होणार 166 कोटी 80 लाख
यापुढील काळात सर्वाधिक लोकसंख्येचा देश हिंदुस्थानच असेल हे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. 2050 मध्ये हिंदुस्थानची लोकसंख्या तब्बल 166 कोटी 80 लाख असेल तेव्हा चीनची लोकसंख्या 131 कोटी 70 लाख असणार आहे. हिंदुस्थानात सध्या तरुणांची सर्वाधिक संख्या दिसत असली तरी 2050 मध्ये वयोवृद्ध नागरिक जास्त असतील. दर पाच हिंदुस्थानींमध्ये एकजण वयोवृद्ध असेल़
वय आणि लोकसंख्येची टक्केवारी
- वय वर्षे 14 पर्यंत 25
- 10-19 वयोगट 18
- 10-14 वयोगट 26
- 15-64 वयोगट 68
जगात प्रत्येक पाच व्यक्तींमागे एक हिंदुस्थानी आहे.
हिंदुस्थान विरुद्ध चीन 300 वर्षांची आकडेवारी (कोटीमध्ये)
इसवीसन लोकसंख्या
(वर्ष) हिंदुस्थान चीन
- 1800 20 33
- 1850 23.5 40.9
- 1900 29.1 40.1
- 1950 35.7 54.3
- 2000 106 126
- 2023 143 142























































