देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाखांच्या पार, गेल्या 24 तासात सर्वात मोठी वाढ

1391

देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात मंगळवारी पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दोन लाखांच्या पार पोहोचला आहे. गेल्या 24 तासात देशात 8909 कोरोनाग्रस्त आढळले असून 217 जणांचा मृत्यू झाला आहे.

सध्या देशात 2,07,615 कोरोनाग्रस्त असून 5,815 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 1,01,497 अॅक्टिव्ह कोरोनाग्रस्त असून 1,00,303 रुग्ण हे बरे झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात आता 72,300 रुग्ण आहेत. तर तामिळनाडूत सध्या 24,586, दिल्लीत 22132 रुग्ण, गुजरातमध्ये 17162 रुग्ण आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या