US-Israel–Iran War – संघर्ष थांबवून चर्चेचा मार्ग स्वीकारा, परराष्ट्र खात्याची पहिली प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आखाताच्या भूमीवर सुरू असलेले युद्ध लवकरात लवकर थांबवण्याचे आवाहन हिंदुस्थान सरकारने केले आहे. ‘हा संघर्ष प्रादेशिक स्थैर्य, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आखाती देशात राहणाऱया सुमारे 1 कोटी हिंदुस्थानी नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक आहे. चर्चा आणि संवादातून यावर मार्ग काढावा, असे आवाहन हिंदुस्थानने केले आहे. हिंदुस्थान सरकारचे आखातातील घडामोडींवर लक्ष असून संबंधित सरकारचे प्रतिनिधी आणि जगातील महत्त्वाच्या नेत्यांशी आमची चर्चा सुरू आहे, असेही परराष्ट्र खात्याने म्हटले आहे.