
हिंदुस्थान व ऑस्ट्रेलियामधील दुसऱ्या कसोटी सामना उद्यापासून सुरू होणार आहे. या सामन्यासाठी बीसीसीआयने आज संघ जाहीर केला. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियात चार बदल करण्यात आले आहेत.
ALERT: #TeamIndia for 2nd Test of the Border-Gavaskar Trophy against Australia to be played in MCG from tomorrow announced. #AUSvIND pic.twitter.com/4g1q3DJmm7
— BCCI (@BCCI) December 25, 2020
खराब फॉर्ममधून जाणाऱ्या पृथ्वी शॉला पहिल्या सामन्यात संधी देण्यात आली होती. मात्र त्या संधीचे पृथ्वीला सोने करता आले नाही. त्यामुळे दुसऱ्या कसोटीतून पृथ्वी शॉला डच्चू देण्यात आला आहे. त्याच्या जागी शुभमन गिलला संधी देण्यात आली. त्या व्यतिरिक्त रिषभ पंतची देखील संघात एन्ट्री झाली आहे. शेवटच्या टी-20 सामन्यात दुखापतग्रस्त झालेला जाडेजा देखील संघात परतला आहे. तर दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेल्या मोहम्मद शमीच्या जागी मोहम्मद सिराजला संधी मिळाली आहे.





























































