हिंदुस्थानचा आजपासून सराव सामना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । सिडनी

ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर असलेला हिंदुस्थानी क्रिकेट संघ क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) इलेव्हन संघाविरुद्ध आजपासून चार दिवसीय सराव सामना खेळणार आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेस 6 डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हात साफ करण्यासाठी ‘टीम इंडिया’साठी हा सराव सामना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

आजच्या सराव सामन्यात लाल चेंडूवर सराव आणि वातावरणाशी जुळवून घेण्याची विराट कोहलीच्या सेनेला एकमेव संधी असेल. मंगळवारी ‘टीम इंडिया’ने सराव सामन्यासाठी तीन तास कसून सराव केला. विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल यांनी कुलदीपच्या लेग स्पिनचा सामना केला. हवामान खात्याने सिडनीमध्ये पुढील 24 ते 36 तासांत पावसाची शक्यता वर्तवली आहे.