
कोरोनामुळे ऑस्ट्रेलियात होणारा टी-20 वर्ल्ड कप पुढे ढकलण्यात आला. यामुळे आता क्रिकेट ऑस्ट्रेलियालाही हिंदुस्थानविरुद्धच्या मालिकेत बदल करावा लागला आहे. दोन देशांमध्ये होणाऱया कसोटी मालिकेआधी वन डे तसेच टी-20 मालिकेचे आयोजन करण्यात येणार आहे. दोन देशांमधील क्रिकेट मालिकेला 26 नोव्हेंबरपासून सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून तात्पुरते वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया व ‘चॅनेल 7’ यांच्यामधील वादावरही या मालिकेचे अंतिम वेळापत्रक अवलंबून असणार आहे.
अॅडलेडला होणार डे-नाइट कसोटी
अॅडलेड येथे डे-नाइट कसोटीचे आयोजन करण्यात येणार आहे. ही कसोटी पिंक अर्थातच गुलाबी चेंडूने खेळवण्यात येईल. हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 17 डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होईल. ही कसोटी डे-नाईट असेल. तसेच मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे कसोटी (26 ते 30 डिसेंबर) आणि सिडनी येथे तिसरी आणि ब्रिस्बेन येथे चौथी कसोटी खेळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
तात्पुरते वेळापत्रक खालीलप्रमाणे
– पहिली वन डे – 26 नोव्हेंबर
– दुसरी वन डे – 28 नोव्हेंबर
– तिसरी वन डे – 30 नोव्हेंबर
– पहिली टी-20 – 4 डिसेंबर
– दुसरी टी-20 – 6 डिसेंबर
– तिसरी टी-20 – 8 डिसेंबर
पिंक बॉल सराव सामना
– पहिली कसोटी – 17 ते 21 डिसेंबर
– दुसरी कसोटी – 26 ते 30 डिसेंबर
– तिसरी कसोटी – 7 ते 11 जानेवारी
– चौथी कसोटी – 15 ते 19 जानेवारी



























































