दुसऱ्या ‘वन डे’पूर्वी टीम इंडियाला धक्का, विस्फोटक फलंदाजाच्या खेळण्यावर सस्पेंस

16830

मुंबईतील घरच्या मैदानावर 10 विकेट्सने दारूण पराभव स्वीकारावा लागल्यानंतर टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे. मधल्या फळीतील विस्फोटक फलंदाज ऋषभ पंत राजकोटमध्ये होणाऱ्या दुसऱ्या एक दिवसीय लढतीत मैदानात उतरणार अथवा नाही यावर सस्पेंस आहे. दुसरा एक दिवसीय सामना 17 जानेवारीला खेळला जाणार आहे.

बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, ऋषभ पंत टीम इंडियाच्या संघासोबत राजकोटला जाणार नाही. तो नंतर संघाशी जोडला जाईल. सामान्यत: डोक्यावर चेंडू लागल्यानंतर 24 तास त्या खेळाडूला डॉक्टरांच्या देखरेखेखाली ठेवण्यात येते, असेही ते म्हणाले. त्यामुळे पंतच्या खेळण्यावर सस्पेंस आहे.

ICC award- रोहितला एकदिवसीय सामन्यातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार

मंगळवारी मुंबईत खेळल्या गेलेल्या पहिल्या एक दिवसीय लढतीत टीम इंडियाला दारूण पराभव स्वीकारावा लागला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने सर्व बाद 255 धावा केल्या. यानंतर ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता 38 व्या षटकात हे आव्हान पार केले. या लढतीदरम्यान टीम इंडियाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत जायबंदी झाल्याने क्षेत्ररक्षणासाठी उतरला नाही.

टीम इंडियाच्या डावाच्या 44 व्या षटकादरम्यान पॅट कमिन्स याचा चेंडू पंतच्या बॅटची कडा घेऊन हेल्मेटवर आदळला. पंत 28 धावा काढून बाद झाला. यानंतर टीम इंडियाचा संघ क्षेत्ररक्षणासाठी उतरला तेव्हा पंत मैदानात आला नाही. पंतच्या जागी के.एल. राहुलने यष्टीरक्षणाची अतिरिक्त जबाबदारी सांभाळली. बीसीसीआयने ट्विटरवर एक पत्रक जारी करत हेल्मेटला चेंडू लागल्याने तो डॉक्टरांच्या देखरेखेखाली असल्याचे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या