IND vS AUS – हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया दुसरी वन-डे आज

मोहम्मद शमी सोडून इतर गोलंदाजांची झालेली धुलाई आणि शिखर धवन वगळता आघाडीच्या फलंदाजांनी केलेली निराशा यामुळे हिंदुस्थानला यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन डे क्रिकेट सामन्यात सपाटून मार खावा लागला. तीन सामन्यांच्या या वन-डे मालिकेतील आव्हान राखायचे असेल तर विराट कोहलीच्या ब्रिगेडला गोलंदाजी आणि फलंदाजीतही वेळीच सुधारणा करावी लागणार आहे. उभय संघांत उद्या (दि. 29) दुसरा सामना रंगणार आहे.

कोहली, राहुलकडून अपेक्षा
जोश हेजलवुड व अॅडम झम्पा यांच्या गोलंदाजीपुढे रोहित शर्माच्या गैरहजेरीत हिंदुस्थानच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. सलामीवीर शिखर धवन व खाली हार्दिक पांडय़ा खेळले म्हणून ‘टीम इंडिया’ला तीनशे धावांचा टप्पा गाठता आला. मात्र, कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार लोकेश राहुल यांच्यावर खरी हिंदुस्थानची मदार आहे. या दोघांपैकी एकाने तरी खेळपट्टीवर उभे राहण्याची गरज आहे. रोहितच्या अनुपस्थितीत मयांक अग्रवालला स्वतःला सिद्ध करण्याची संधी असेल. त्याने त्याचे सोने करायला हवे. चौथ्या क्रमांकावरील श्रेयस अय्यरनेही या क्रमांकाची जबाबदारी ओळखून खेळायला हवे. आघाडीच्या फळीने धावा केल्या तर तळाला हार्दिक पांडया व रवींद्र जाडेजा मुक्तपणे फलंदाजी करून धावांचा वेग वाढवू शकतात.

‘टीम इंडिया’ला दंड
‘टीम इंडिया’ला ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या लढतीत 66 धावांनी हार तर पत्करावीच लागली, पण दंडात्मक कारवाईलाही सामोरे जावे लागले. हिंदुस्थानी गोलंदाजांनी निर्धारित वेळेत 50 षटके टाकली नाहीत, म्हणून संघातील प्रत्येक खेळाडूचे सामन्यातील 20 टक्के मानधन कापण्यात आले. सामनाधिकारी डेव्हिड बून यांनी ही कारवाई केली. मैदानी पंच रॉड टकर व सॅम नोगाज्सकी, तिसरे पंच पॉल राइफल व चौथे पंच गेरार्ड एबूद यांनी सामनाधिकाऱयांकडे याबाबत तक्रार केली होती. हिंदुस्थानचा कर्णधार विराट कोहलीने चूक मान्य केल्याने याबाबत कोणतीही सुनावणी होणार नाही.

फलंदाजांवर अंकुश ठेवण्याची गरज
सिडनीतच झालेल्या सलामीच्या लढतीत हिंदुस्थानला पहिला बळी मिळविण्यासाठी 28व्या षटकापर्यंत वाट बघावी लागली. येथेच शंकेची पाल चुकचुकली होती. डेव्हिड वॉर्नर आणि कर्णधार अॅरोन पिंच यांनी दीडशतकी सलामी देऊन हिंदुस्थानची गोलंदाजी निष्प्रभ ठरविली. फिरकीसाठी अनुपूल नसलेल्या खेळपट्टीवर हिंदुस्थानच्या वेगवान गोलंदाजांना जबाबदारी उचलावी लागणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फळीवर अंपुश ठेवला अन् ‘टीम इंडिया’ला मालिकेत पुनरागमन करणे शक्य होणार आहे. यजमानांकडे वॉर्नर-पैंच या जोडीसह स्टीवन स्मिथ, मार्पस स्टोयनीस व ग्लेन मॅक्सवेल असा तगडा फलंदाजीक्रम आहे. जसप्रीत बुमराह व नवदीप सैनी यांनी लवकर ऑस्ट्रेलियातील खेळपट्टय़ांशी जुळवून घेण्याची गरज आहे. रवींद्र जाडेजाने काही प्रमाणात धावा रोखण्याचे काम केले. मात्र, प्रमुख फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल सर्वात महागडा ठरला. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झम्पाने 4 बळी मिळविले, त्यामुळे युझवेंद्र चहलने त्याच्यापासून प्रेरणा घेत कमबॅक करायला हवे.

उभय संघ
n हिंदुस्थान ः विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांडय़ा, मयांक अग्रवाल, रवींद्र जाडेजा, युझवेंद्र चहल, पुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठापूर.
n ऑस्ट्रेलिया ः अॅरोन फिंच (कर्णधार), डेविड वॉर्नर, स्टीवन स्मिथ, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, मार्पस स्टोयनीस, एलेक्स वैरी, पॅट कमिंस, मिशेल स्टार्वै, अॅडम झम्पा, जोश हेजलवुड, सीन एबोट, अॅश्टोन एगर, पॅमरून ग्रीन, मोइजेस हेनरिक्स, अॅण्डय़ू टॉय, डॅनियल सॅम्स, मॅथ्यू वेड.

आजची दुसरी वन डे लढत
हिंदुस्थान – ऑस्ट्रेलिया, सिडनी
सकाळी 9.10 वाजता

आपली प्रतिक्रिया द्या