
लॉर्ड्स कसोटीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर हिंदुस्थानी संघाकडून सर्वांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र हेडिंग्ले मैदानावर हिंदुस्थानचा पहिला डाव अवघ्या 78 धावांवर आटोपला आहे.
तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. मात्र त्याचा हा निर्णय पूर्णपणे फसला. सुरुवातीला अवघ्या चार धावांवर दोन विकेट पडल्या. यानंतर रोहितने रहाणेसोबत चौथ्या विकेटसाठी 35 धावांची भागीदारी केली. फक्त 58 धावांवर हिंदुस्थानचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. यानंतर इंग्लंडच्या संघाने टीम इंडियाच्या एकही फलंदाजाला मैदानावर टिकू दिले नाही. तीन फलंदाज शून्यावर बाद झाले. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि क्रेग ओव्हरटन यांनी प्रत्येकी तीन तर सॅम कुरन आणि ओली रॉबिन्सनने प्रत्येकी दोन बळी घेतले. दरम्यान, इंग्लंडची फलंदाजी सुरू झाली आहे.
India are all out ☝️
An excellent bowling performance from the hosts on day one in Leeds #WTC23 | #ENGvIND | https://t.co/AZCdNvbRbc pic.twitter.com/gTOS7U1Gc6
— ICC (@ICC) August 25, 2021





























































