घरच्या मैदानावर रूटचा धमाका, तिसऱया कसोटीत यजमान इंग्लंडचे वर्चस्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्णधार जो रूट (121धावा) याने गुरुवारी तिसऱया कसोटीचा दुसरा दिवस गाजवला. या मालिकेतील सलग तिसरे खणखणीत शतक साजरे करताना त्याने इंग्लंडला प्रंटफूटवर नेले. घरच्या मैदानावर खेळताना त्याने कसोटी कारकीर्दीतील 23वे शतक दिमाखात साजरे केले. जो रूटने शतकी खेळीत 14 चौकार मारले हे विशेष. रोरी बर्न्स, हसीब हमीद या सलामीवीरांसह तीन वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱया डेव्हिड मलान यानेही अर्धशतकी खेळी साकारली. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा इंग्लंडने 7 बाद 399 धावा केल्या होत्या. या कसोटीच्या पहिल्या दिवशी (बुधवारी) हिंदुस्थानचा पहिला डाव 78 धावांमध्येच आटोपला होता.

135 धावांची सलामी

रोरी बर्न्स व हसीब हमीद या सलामी जोडीने 135 धावांची भागीदारी करताना इंग्लंडसाठी मोलाची कामगिरी बजावली. पहिल्या दिवसअखेर बिनबाद 120 धावा केल्या होत्या. गुरुवारी सकाळच्या सत्रात या सलामीवीरांना धावसंख्येत मोठी भर टाकता आली नाही. मोहम्मद शमीच्या झपकन आत येणाऱया चेंडूवर रोरी बर्न्स त्रिफळाचीत झाला. रोरी बर्न्सने 153 चेंडूंत एक षटकार व सहा चौकारांसह 61 धावांची खेळी केली.

जाडेजाने उडवला हमीदचा त्रिफळा

रोरी बर्न्स बाद झाल्यानंतर हसीब हमीदच्या सोबतीला डेव्हिड मलान आला. दोघांनी 24 धावांची भागीदारी केली. पण या जोडीला मोठी भागीदारी करता आली नाही. रवींद्र जाडेजाच्या उत्पृष्ट चेंडूवर हसीब हमीदची दांडी गुल झाली. हसीब हमीदने 195 चेंडूंत 12 चौकारांसह 68 धावांची खेळी केली.

139 धावांची भागीदारी

डेव्हिड मलान व जो रूट या जोडीने तिसऱया विकेटसाठी 139 धावांची सणसणीत भागीदारी रचत हिंदुस्थानचा पाय आणखीनच खोलात नेला. दोघांनीही हिंदुस्थानी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. डेव्हिड मलान काही प्रमाणात चाचपडताना दिसला. पण जो रूटच्या फलंदाजाने स्टेडियममधील उपस्थित क्रिकेटप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडले. मोहम्मद सिराजने डेव्हिड मलानला 70 धावांवर यष्टिरक्षक रिषभ पंतकरवी झेलबाद केले. मलानने या खेळीत 11 चौकार चोपून काढले. मोहम्मद शमीने जॉनी बेअरस्टोला 29 धावांवर बाद केले. त्याने जो रूटसोबत 52 धावांची भागीदारी रचली.