हिंदुस्थानच्या युवा संघाचा मालिका विजय

सामना ऑनलाईन । हंबनटोटा

हिंदुस्थानच्या १९ वर्षांखालील युवा क्रिकेट संघाने शुक्रवारी यजमान श्रीलंकेच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाचा एक डाव व १४७ धावांनी धुव्वा उडवला आणि दोन सामन्यांची युथ कसोटी मालिका २-० अशा फरकाने खिशात टाकली.

हिंदुस्थानच्या युवा संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद ६१३ धावांचा डोंगर उभारला. मोहित जांगडा ऍण्ड कंपनीच्या जबरदस्त गोलंदाजीसमोर यजमान संघातील फलंदाजांची डाळच शिजली नाही. अखेर त्यांचा पहिला डाव ३१६ धावांवर गडगडला. मोहीत जांगडा याने सर्वाधिक ४ फलंदाज बाद केले. हिंदुस्थानच्या युवा संघाने त्यांच्यावर फॉलोऑन लादला. श्रीलंकेच्या युवा संघाचा दुसरा डाव १५० धावांमध्येच गारद झाला. डावखुरा गोलंदाज सिद्धार्थ देसाई याने ४० धावा देत ४ फलंदाज बाद केले.

आपली प्रतिक्रिया द्या