हिंदुस्थानी सैन्याचे अधिकारी सहा दिवसांपासून बेपत्ता, शोध सुरू

298

हिंदुस्थानी सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत असलेले गौरव सोलंकी नावाचे अधिकारी गेल्या शनिवारपासून बेपत्ता झाले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या शांति मिशन अंतर्गत ते डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो इथे कर्तव्यावर तैनात होते.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, लेफ्टनंट कर्नल गौरव सोलंकी कयाकिंग येथील किवु सरोवरावर गेले होते. मात्र तिथून ते परतेलच नाहीत. त्यांच्या सोबत असलेले सर्व जण परतले मात्र तेच बेपत्ता आहेत. त्यामुळे त्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम राबवण्यात येत आहे. त्यासाठी स्पीड बोटी आणि हेलिकॉप्टर यांचा वापर केला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या