हिंदुस्थानचा विकास दर 6.1 टक्के, वर्ल्ड बँकेपाठोपाठ नाणेनिधीचा झटका

302

डळमळीत झालेल्या हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेला मंगळवारी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) यंदाचा विकास दर कसाबसा 6.1 टक्क्यांवर जाईल, असा अंदाज वर्तवून ‘जोर का झटका’ दिला. एप्रिलमधील अंदाजात 1.2 टक्क्यांची कपात केली. रविवारी वर्ल्ड बँकेनेही विकास दर 6 टक्क्यांवर राहील, असा अंदाज वर्तवला होता.

गेल्या वर्षी देशाचा विकास दर 6.8 टक्के होता. यंदाच्या पहिल्या तिमाहीत विकास दर 5 टक्क्यांवर आला आहे. आयएमएफने एप्रिलमध्ये अंदाज वर्तवताना हा विकास दर 7.3 टक्क्यांवर जाईल, असे म्हटले होते. त्यात 1.2 टक्क्यांच्या कपातीचे भाकीत करून आयएमएफने मंगळवारी मोदी सरकारला झटका दिला. याच वेळी हा विकास दर 2020मध्ये 7 टक्क्यांवर जाईल, असा आशेचा किरणही दाखवला आहे.

निर्यात 6.57 टक्क्यांनी, तर आयात 13.58 टक्क्यांनी घटली

सप्टेंबरमध्ये पेट्रोलियम, इंजिनीअरिंग, लेदर, केमिकल्स आणि हिरे-दागिने या प्रमुख क्षेत्रांतील निर्यातीचे प्रमाण 6.57 टक्क्यांनी म्हणजेच 26 अब्ज डॉलरपर्यंत घटले, तर आयातीला 13.85 टक्क्यांचा फटका बसून ती 36.89 अब्ज डॉलरपर्यंत घसरली.

आपली प्रतिक्रिया द्या