2 कोटी हिंदुस्थानींच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, मध्यमवर्गीयांवर मोठे संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

जागतिक अर्थव्ययवस्थेवर सध्या मंदीचे सावट आहे. त्यातच जागतिक अस्थिरतादेखील वाढत आहे. त्यातच आता अनेक कंपन्या नोकरकपात करत आहेत. त्यामुळे मध्यमवर्गींयावर मोठे संकट आहे. त्यातच आता काही तज्ज्ञांनी धोक्याचा इशारा दिला आहे. त्यात म्हटले आहे की, सुमारे 2 कोटी हिंदुस्थानींना नोकऱ्या गमवाव्या लागू शकतात. त्यामुळे मध्यम वर्गीयांवरील संकच अधिक गडद होणार आहे. हिंदुस्थानात मध्यमवर्गीय नोकरदारांसमोर मंदीमुळे नव्हे तर इतर विविध कारणांमुळे संकट अधिकच गहिरे होत आहे. मार्सेलस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्सचे संस्थापक सौरभ मुखर्जी यांनी इशारा देला आहे की, बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी तातडीने काही पावले उचलणे गरजेचे आहे. तसे झाले नाही तर त्याचे परिणाम विनाशकारी असू शकतात.

मुखर्जी यांनी म्हटले आहे की, नोकऱ्या कमी होणे हे मंदीमुळे नाही तर कॉर्पोरेट ऑपरेशन्स, एआय आणि जागतिक व्यापार परिस्थितीमुळे आहे. एका पॉडकास्टमध्ये मुखर्जी यांनी हिंदुस्थानातील व्हाईट कॉलर जॉब मार्केटमध्ये सुरू असलेल्या अस्वस्थतेची माहिती दिली. ते म्हणाले, आपण जॉब मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालथ पाहत आहोत. आयटी, बँकिंग आणि मीडिया सारख्या मध्यमवर्गीय नोकऱ्या गिग जॉबने बदलतील. हिंदुस्थानला त्याचा पूर्णपणे अनुभव घेण्यासाठी दोन ते तीन वर्षे लागतील असा त्यांचा अंदाज आहे. या काळात, पगारदार नोकऱ्यांचा एक महत्त्वाचा भाग नाहीसा होऊ शकतो. त्यानंतर हिंदुस्थान एक प्रमुख गिग अर्थव्यवस्था बनेल. ते राइडशेअर आणि अन्न वितरणापुरते मर्यादित राहणार नाही. सर्व समाज या गिग अर्थव्यवस्थेचा भाग असेल, असे ते म्हणाले.

हे संकट आर्थिक मंदीचा परिणाम नाही. तर खर्च कमी करण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी कंपन्यांनी एआयचा पर्याय स्वीकारल्यामुळे हे घडले आहे. मुखर्जी म्हणाले, प्रत्येक कंपनीत एआय लोकांची जागा घेत आहे, मग ती आपल्या पोर्टफोलिओमधील बँका असोत, आपण ज्या मीडिया संस्थांशी संवाद साधतो किंवा चीनच्या पोर्टफोलिओमधील आयटी सेवा प्रदाते असोत. जाहिराती देखील एआय-आधारित झाल्या आहेत. जाहिरातीतील मॉडेल देखील एआय आहे, असे ते म्हणाले.

घरगुती कर्जाचा वाढता भार या ताणात आणखी भर घालत आहे. मुखर्जी यांच्या मते, गृहकर्ज वगळता, भारतीय घरगुती कर्ज हे उत्पन्नाच्या ३३-३४% आहे, जे जगात सर्वाधिक आहे. अर्थव्यवस्थेवर कर्जाचे एवढे ओझे आहे की त्याची परतफेड करण्यास वेळ लागेल. म्हणून, येणारा काळ कठीण असणार आहे. त्यात मध्यमंवर्गावरील आव्हाने वाढणार आहेत.

अमेरिकेने त्यांचे टॅरिफ मागे घेतले नाहीत तर ख्रिसमसपर्यंत 2 कोटी हिंदुस्थानींच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड कोसळण्याची भीती असल्याचे ते म्हणाले. दरवर्षी 2-5 लाख कमावणाऱ्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिंदुस्थान आणि अमेरिकेत व्यापार करार होणे गरजेचे आहे. तसे झाले तर या संकटातून मार्ग निघण्याची शक्यता आहे.