एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्यांसाठी खूषखबर, रेल्वे देणार ही जबरदस्त सुविधा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोबाईल हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे. हल्ली प्रवासादरम्यान लोकं मोबाईलमधील इंटरनेटचा वापर करून टाईमपास करत असतात. मात्र लांबपल्ल्याच्या गाड्यांमध्ये प्रवास करताना बऱ्यादा मोबाईलचं नेटवर्क येत जात असतं त्यामुळे प्रवासात मोबाईल वापरता येत नाही. अनेकदा असा प्रवास कंटाळवाणा होतो. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी रेल्वेने एक जबरदस्त सुविधा आणली आहे.

भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान प्रवाशांसाठी हॉटस्पॉट उपलब्ध करून देणार आहे. प्रीमियम ट्रेनचे प्रवासी या सोयीचा लाभ मिळवू शकणार आहे. हॉटस्पॉटमुळे आता प्रवाशांना प्रवासादरम्या आवडीचे चित्रपट/वेबसिरीज पाहता येणार आहेत. ही सुविधा एप्रिल पासुन सुरू होत आहे. राजधानी, शताब्दी, हमसफर आणि दूरांतो सारख्य़ा एसी ट्रेन मध्ये ही सुविधा दिली जाणार आहे. या ट्रेनमध्ये ऑन डिमांड कंटेट सुद्धा पाहता येऊ शकतो. तसेच इंटरनेटची ही सोय रेल्वेने पूर्णपणे मोफत ठेवली आहे.

रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही.के यादव यांनी सांगितले की, यासाठी टेंडर जाहीर झालेले आहे. लवकरचं कंटेट प्रोव्हायडर निश्चीत करण्यात येईल. ट्रेनमध्ये कंटेट प्रोवायडरला हॉटस्पॉट लावायला लागेल. प्रवाशांचे आयपॅड, मोबाईल, लॅपटॉप हॉटस्पॉटने कनेक्ट होईल. या अॅपमुळे प्रवासी आपल्या आवडीचे चित्रपट पाहू शकतात तसेच त्यांना हवा असलेला चित्रपटाची ते प्रोव्हाडरकडे मागणी देखील करू शकतात.