
बाईक रायडर आणि मुंबईकर असलेल्या योगेश अलेकारीची बाइक ब्रिटनमध्ये चोरीला गेल्याची घटना घडली आहे. योगेश अलेकारी हा सोशल मीडियावर रोमिंग व्हील्स नावाने ओळखला जातो. योगेशची केवळ बाइक चोरीला गेली नाही तर पासपोर्ट, रोख रक्कम आणि कॅमेरासुद्धा चोरीला गेला आहे. यामुळे योगेशने सोशल मीडियार एक व्हिडीओ शेअर करून मदत मागितली आहे. योगेश 1 मेपासून बाइकवर निघाला होता. आतापर्यंत 118 दिवसात 17 दिवसात फिरला असून 24 हजार किलोमीटरहून अधिक अंतर कापले आहे. नॉटिंघम येथे मित्राला भेटण्याठी गेला असता तेथून बाइक चोरीला गेली आहे.