
हिंदुस्थानी शेअर बाजार गुरुवारी चांगलाच वधारला. सेन्सेक्स 446 अंकांनी वाढून 85,632 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 139 अंकांनी वाढून 26,192 अंकांवर बंद झाला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्स किरकोळ घसरणीसह बंद झाले. बीएसई लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन 68 हजारांनी वाढून 472.42 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. मागील आठवड्यात ते 475.74 लाख कोटी रुपये होते. सेन्सेक्सच्या 30 पैकी केवळ 15 शेअर्समध्ये वाढ झाली.



























































