ऑस्ट्रेलियात हिंदुस्थानी महिलेचा अपघातात मृत्यू

ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे एका 33 वर्षीय हिंदुस्थानी महिलेचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. समन्विता धरेश्वर असे या महिलेचे नाव असून ती तिच्या पती आणि तीन वर्षांच्या मुलासोबत चालली होती. रात्री 8 च्या सुमारास तिच्या कारला वेगाने आलेल्या बीएमडब्ल्यू कारने जोरदार धडक दिली. या अपघातात ती गंभीर जखमी झाली. तिला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. कारमध्ये असलेल्या तिच्या पतीला आणि तीन वर्षीय मुलाला किरकोळ दुखापत झाली आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.