तिसऱ्या टी-20 सामन्यात हिंदुस्थानी महिला पराभूत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तिसऱ्या आणि निर्णायक टी-20 क्रिकेट लढतीत हिंदुस्थानी महिला संघाचा सात गडी राखून पराभव करून यजमान इंग्लंड महिला संघाने तीन टी-20 सामन्यांची मालिका खिशात घातली. तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत पहिल्या सामन्यात इंग्लंड महिला संघाने 9 विकेट राखून हिंदुस्थानी महिला संघाचा धुव्वा उडवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती, मात्र दुसऱया सामन्यात हिंदुस्थानी महिला संघाने इंग्लंडचा 8 विकेट राखून पराभव करून जशास तसे उत्तर दिले होते. दुसऱया सामन्यातील विजयासह हिंदुस्थानी महिला संघाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली होती. त्यामुळे या निर्णायक टी-20 लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.