
हिंदुस्थानींनी दुबईत तब्बल 84 हजार कोटी रुपयांची प्रॉपर्टी खरेदी केली आहे. 2024 या वर्षात 35 बिलियन दिरहम म्हणजेच जवळपास 84 हजार कोटींची मालमत्ता खरेदी केली आहे. दुबईची एकूण मालमत्ता ट्रान्झॅक्शन 411 बिलियन दिरहमपर्यंत पोहोचले आहे. जे मागील वर्षाच्या तुलनेत 37 टक्के जास्त आहे. तर 2025 च्या सहामाहीतील हा आकडा 431 बिलियन दिरहमपर्यंत पोहोचला आहे. दुबईत प्रॉपर्टी खरेदी करताना कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. तसेच दुबईत संपूर्ण कमाई टॅक्स फ्री आहे. हिंदुस्थानात प्रॉपर्टी खरेदी केल्यानंतर स्टँप डय़ुटी, नोंदणी फी द्यावी लागते. तसेच दरवर्षी प्रॉपर्टी टॅक्स भरावा लागतो. दुबईत प्रॉपर्टी खरेदी करण्यामागे भाडय़ातून चांगले पैसे मिळतात.
























































