
पाकिस्तानकडून सतत हिंदुस्थानवर हल्ले सुरू आहे. आणि हिंदुस्थान पाकिस्तानला उत्तर देत आहे. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात हिंदुस्थानच्या काही एअरबेसचे नुकसान झाले आहे. आज परराष्ट्र मंत्रायल आणि संरक्षण मंत्रालयाने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. तेव्हा कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की पाकिस्तानने जम्मू कश्मीरच्या उधमपूर, पंजाबच्या पठाणकोट आणि आदमपूर, गुजरातच्या भूज एअरबसवर हल्ला केला होता. त्यात हिंदुस्थानचे नुकसान झाले आहे.
कर्नल कुरेशी म्हणाल्या की पाकिस्तानकडून हिंदुस्थानातील रुग्णालय आणि शाळांना लक्ष्य केले जात आहे. तसेच ब्राह्मोस फॅसिलिटी नष्ट केल्याचा दावा खोटा आहे, S400 डिफेन्स सिस्टमही पूर्णपणे सुरक्षित असल्याचे कुरेशी यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेत कर्नल सोफिच कुरेशी यांच्यासोबत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री आणि विंग कमांडर व्योमिका सिंहही उपस्थित होत्या. कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की पाकिस्तानी सैन्यांनी पश्चिम भागात सतत आक्रमण सुरू ठेवले आहे. त्यात युकॅब ड्रोन, लाँग रेंज वीपन्स, लाईट इम्युनिशन आणि लढाऊ विमानांचा वापर केला गेला आहे. यात पाकिस्तान्यांनी सैनिकांच्या तळांनाही लक्ष्य केले आहे.
नियंत्रण रेषेवरही पाकिस्तानने ड्रोन पाठवले असून मोठ्या प्रमाणात गोळीबार केला आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवर आणि एलओसीवरील श्रीनगर ते ढलियापर्यंत 26 ठिकाणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला गेला. हिंदुस्थानी सशस्त्र दलाने पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवून लावले आहेत. असे असले तरी उधमपूर, पठाणकोट, आदमपूर आणि भूज येथील हवाई दलावरील मोठं नुकसान झालं आहे. पाकिस्ताने रात्री 1.40 मिनिटांनी हायस्पीड मिसाईलचा वापर करून पंजाबमधील एअरबसवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असेही कुरेशी यांनी सांगितले.