
इंडिगो एअरलाईन्सची विमाने रद्द झाल्यामुळे देशभरातील हजारो प्रवाशांना यांचा फटका बसला. अनेकांची महत्त्वाची कामे रखडली, अनेकांना आपल्या कुटुंबीयांना भेटता आले नाही, तर काहींनी स्वत:च्याच लग्नात उपस्थित राहता आले नाही. हरयाणातील रोहतक जिल्ह्यातील एका कुटुंबही यामुळे अडचणींचा सामना करावा लागला.मात्र, या कुटुंबाने घेतलेला एक निर्णयाचे आज देशभरात कौतुक केले जात आहे.
हरयाणातील मायना गावचा आंतरराष्ट्रीय नेमबाज खेळाडू आशीष चौधरी पंघाल इंदूरमधील एका कॉलेजमध्ये शिकत असून तो 12वीचा विद्यार्थी आहे. तो नुकताच सुट्टीसाठी घरी आला होता. आशीषला 6 डिसेंबर रोजी कॉलेजमध्ये आयोजित एका सन्मान सोहळ्यात सन्मानित केले जाणार होते. याशिवाय, त्याच्या प्री-बोर्ड परीक्षा 8 डिसेंबरपासून सुरू होणार होत्या. त्यामुळे त्याला 6 डिसेंबरच्या आधी कॉलेजमध्ये पोहोचणे गरजेचे होते.
दरम्यान या दोन्ही कार्यक्रमांसाठी वेळेवर पोहोचण्यासाठी दिल्लीहून इंदूरला जाण्यासाठी इंडिगोचे विमानाचे बुकिंग केले होते. 6 डिसेंबरला आशीषचे वडील आशीषला दिल्ली विमानतळावर सोडायला पोहोचले.मात्र इंडिगोच्या विमानांच्या गोंधळामुळे त्याला वेळेत शक्य नव्हते. विमानतळावर पोहोचल्यावर त्यांना कळले की इंदूरला जाणारे इंडिगोचे विमान अचानक रद्द झाले आहे. ही बातमी ऐकून आशीषच्या कुटुंबाची चिंता वाढली.
विमान रद्द झाल्यामुळे आशीष सन्मान सोहळ्यात उपस्थित राहता य़ेणार नव्हते. तसेच त्याला परिक्षाही देता येणे अशक्य होते. यावेळी आशीषच्या कुटुंबीयांनी तत्काळ रेल्वे तिकिट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र इंदूरसाठी सीट कन्फर्म होणे कठीण होते. अशा परिस्थितीत आशीषच्या वडिलांनी वेळ न घालवता त्याला कारने इंदूरला सोडण्याचा निर्णय घेतला.
दिल्ली ते इंदूर हे सुमारे 8०० किलोमीटरचे अंतर आहे. एवढे अंतर पार करण्यासाठी साधारणपणे 12 ते 14 तास लागतात. यावेळी वडिलांनी मुलाच्या शिक्षणासाठी मोठे पाऊल उचलले. त्यांनी त्याच दिवशी रात्री कारने प्रवास सुरू केला. रात्रभर न थांबता डोळ्यात तेल ओतून त्यांनी 800 किमी रस्ता पार केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते आशीषला घेऊन इंदूरला पोहोचले. मुलाच्या भविष्यासाठी घेतलेल्या त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.



























































