
गेल्या पाच दिवसांपासून इंडिगो एअरलाइन्सने अचानक रद्द केलेल्या फ्लाईट्मुळे प्रवाशांचा संयमही सुटला. अनेक विमानतळांवर इंडिगोचे कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये भांडणे झाली. परिस्थिती बिकट होताच, विमान वाहतूक नियामक डीजीसीएने शनिवारी कठोर भूमिका घेतली. इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स आणि अकाउंटेबल मॅनेजर इसिड्रो पोर्केरास यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आणि 24 तासांच्या आत उत्तर देण्यास सांगितले. तसेच रद्द झालेल्या तिकिटांचे पूर्ण पैसे रविवारी सायंकाळी 8 वाजेपर्यंत परत करण्याचे तसेच सामान 48 तासांमध्ये परत करण्याचे आदेश इंडिगोला देण्यात आले आहेत.
— IndiGo (@IndiGo6E) December 6, 2025
इंडिगो आज 1500 उड्डाणे घेणार
दरम्यान आता इंडिगोने पुन्हा एकदा एक पोस्ट शेअर करत रविवारी होणाऱ्या उड्डाणांबाबत सविस्तर माहिती दिली आहे. इंडिगोने अधिकृत निवेदनात कबूल केले की नेटवर्क पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांना मोठ्या संख्येने उड्डाणे रद्द करावी लागली होती. दरम्यान आता एअरलाइनच्या निवेदनानुसार, इंडिगो आज, रविवारी दीड हजाराहून अधिक विमानं उड्डाणे घेणार आहेत. त्यातून ९५ टक्के कनेक्टिविटी पूर्ववत होईल. इंडिगोने स्पष्ट केले की त्यांनी त्यांच्या 138 पैकी 135 ठिकाणांसाठी उड्डाण सेवा पुन्हा सुरू केली आहेत.
विमान कंपनीने प्रवाशांची माफी मागितली
गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांना होणाऱ्या त्रासामुळे इंडिगोने दिलगिरी व्य़क्त केली. आम्हाला माहित आहे की आम्हाला अजून बराच पल्ला गाठायचा आहे, परंतु आम्ही आमच्या ग्राहकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. या कठीण काळात आमच्या प्रवाशांनी आणि कर्मचाऱ्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो.”
दरम्यान, नागरी उड्डाण मंत्री के. राममोहन नायडू यांनीही परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एअरलाइन्सच्या सीईओंसोबत बैठक घेतली. भविष्यात अशा प्रकारचे प्रॉब्लेम टाळण्यासाठी मंत्रालयाने इंडिगोला ठोस पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.
इंडिगोचा गोंधळ थांबेना; प्रवाशांचा उद्रेक! दोन दिवसांत प्रवाशांचे पैसे परत करा, इंडिगोला तंबी


























































