Video : जवानांच्या देशभक्तीला शतश: प्रणाम! 18 हजार फुटांवर फडकवला ‘तिरंगा’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लडाख

देशभरात आज प्रजासत्ताक दिनाची धूम सुरू आहे. मात्र हिंदुस्थानचे जाबाँज जवान आजही देशातील जनतेच्या सुरक्षेसाठी सीमेवर तैनात आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही जवानांची कर्तव्याची भावना आणि देशावरचं निस्सीम प्रेम तसुभरही कमी होत नाही. प्रजासत्ताक दिनानिमित्त आज लडाखमध्ये 18 हजार फूट उंचावर जवानांनी तिरंगा फडकवला आहे. इंडो तिबेटीअन सीमासुरक्षा दलाच्या जवानांनी उणे 30 अंश सेल्सियस इतक्या कमी तापमानातही तिरंगा फडकवला. या जवानांचे तिरंगा फडकवतानाचे व्हि़डीओ व फोटो बघून प्रत्येक हिंदुस्थानीचा ऊर अभिमानाने भरून येईल हे नक्की!

पाहा व्हिडीओ –

– पाहा फोटो