मासेमारी करायला गेलेल्या कोळ्यांच्या जाळ्यात आयफोनचा खजिना!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

मासेमारी करणाऱ्या एका कोळ्यांच्या जाळ्यात चक्क खजिना गवसला आहे. नेहमीच्या माश्यांच्या जागी कोळ्यांना असं काही सापडलं आहे की त्यामुळे त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. मच्छिमारी करणाऱ्यांना जाळ्यात आयफोनचे भरलेले, सीलबंद बॉक्स लागले आहेत.

ही घटना इंडोनेशियातील आहे. येथील मासेमारी करणारं एक पथक बांग्का बेलितुंग नदीत मासेमारी करायला गेलं होतं. तिथे त्यांची नजर पाण्यावर तरंगणाऱ्या काही बॉक्सेसवर पडली. ते त्यांच्या होडीला बॉक्सजवळ घेऊन गेले आणि ते बॉक्स त्यांनी होडीत घेतले.

त्या बॉक्सेसना उघडून पाहिल्यानंतर आत आयफोन, आयपॅड्स, मॅकबुक्स दिसले. ते पाहून त्यांना धक्काच बसला. या सगळ्या मालाची किंमत काही कोटींमध्ये आहे. एका मच्छिमाराने याचा व्हिडीओ बनवून टाकला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्याला पसंतीही मिळताना दिसत आहे.

हा व्हिडीओही प्रसिद्ध झाला असून त्याला नेटकरी पसंती देताना दिसत आहेत. तसंच या मच्छिमारांचं नशीब पालटल्याची भावनाही व्यक्त होताना दिसत आहे.