
शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आज अखेर ती तुरुंगाबाहेर आली. अटकेनंतर तब्बल साडे सहा वर्षांनी ती तुरुंगाबाहेर आली आहे. दोन लाखांच्या जातमुचलक्यावर आणि तेवढय़ाच किमतीच्या हमीवर न्यायालयाने तिची सुटका केली
Sheena Bora murder case | Indrani Mukherjea walks out of Byculla Jail a day after she was granted bail by Special CBI court on Rs 2 lakh surety.
“I am very happy,” she says. pic.twitter.com/JWSVqJuc2b
— ANI (@ANI) May 20, 2022
इंद्राणीचे सहआरोपी जामिनावर बाहेर आहेत. त्यामुळे तिला जामीन मंजूर करण्यात आला आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने जामीन देताना स्पष्ट केले. सीबीआयने मुंबईत घडलेल्या हायप्रोफाईल हत्याकांडाचा तपास करत इंद्राणी मुखर्जीला अटक केली होती. सुरुवातीला शीना ही इंद्राणी मुखर्जीची बहीण असल्याचे म्हटले जात होते. मात्र, पोलिसांच्या चौकशीत ती इंद्राणी मुखर्जीची पहिल्या पतीची मुलगी असल्याचे उघड झाले. मुंबईतील उच्चभ्रू समाजातील ऑनर किलिंगची ही पहिलीच घटना होती.


























































