इंदुरीकर महाराजांना समन्स, 7 ऑगस्टला न्यायालयात वारी

1243
nivrutti-indurikar-1

प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांनी कीर्तनातून प्रसूतीपूर्व गर्भलिंग चिकित्सा नियंत्रण कायद्याचा (पीसीपीएनडीटी) भंग केल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरुद्ध कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली होती. आज त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने इंदुरीकर महाराजांना 7 ऑगस्ट रोजी म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

‘सम तिथीला संबंध ठेवल्यास मुलगा होतो व विषम तिथीला मुलगी,’ असे वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी केले होते. जिल्हा रुग्णालयाच्या पीसीपीएनडीटी सल्लागार समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. तेथे झालेल्या निर्णयानुसार ही तक्रार दाखल झाली होती. वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर यांनी फिर्याद आणि पुराव्याची कागदपत्रे न्यायालयात दाखल केली.

आपली प्रतिक्रिया द्या