इन्फोसिसने 195 कर्मचाऱ्यांना काढले

आयटी सेक्टर कंपनी इन्फोसिसमध्ये पुन्हा एकदा कर्मचारी कपात केली जाणार आहे. कंपनी आता 195 कर्मचारी आणि ट्रेनीला कामावरून काढून टाकणार आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या असेसमेंट चाचणीत पास न झाल्याने या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. या निर्णयामुळे ट्रेनी कर्मचाऱयांची संख्या आता 800 पर्यंत खाली आली आहे. कंपनीतील ट्रेनी कर्मचाऱ्यांच्या कपातीचा हा तिसरा टप्पा आहे. फेब्रुवारीत 320 ट्रेनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढले होते.