
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
इजिप्तसोबत संबंध अधिक दृढ करण्यादृष्टीने हिंदुस्थानने आपली युद्धनौका आयएनएस तरकश सुएझ कालव्यातून इजिप्तच्या नौदलाच्या अलेक्झांड्रिया बंदरात पाठवली आहे. हिंदुस्थानची ही युद्धनौका पुढील तीन दिवस तिथे राहणार आहे. आयएनएस तरकश ही आधुनिक युद्धनौकापैकी एक आहे. विविध प्रकारच्या आधुनिक प्रणालीने ही युद्धनौका सज्ज आहे. दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ व्हावेत यासाठी हिंदुस्थानने दिलेले वचन पाळत युद्धनौका इजिप्तला पाठवली आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या नौदलात सहकार्य वाढेल. या तीन दिवसांत इजिप्तचे नौसैनिक या युद्धनौकेला भेट देतील. तसेच दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांकडून सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर करण्यात येतील. दोन्ही देशांतील नौदलाच्या सैन्यामध्ये सहकार्य आणि सद्भाव वृद्धिंगत होईल.
Some pix of #INSTarkash during her passage through the Suez Canal prior entering Alexandria, Egypt pic.twitter.com/tZeE4bsZnl
— SpokespersonNavy (@indiannavy) June 28, 2019
इजिप्तची भौगोलिक स्थान ही एक अत्यंत जमेची बाजू आहे. आफ्रिका, आशिया आणि युरोपच्या मध्यावर हा देश असून या भागातून अनेक सागरी व्यापारी मार्ग जातात, जे लाल सागरातून भूमध्य सागराकडे इजिप्तच्या सुएझ कालव्यातून जातात. दरम्यान, आयएनएस तरकशच्या या भेटीचे नेतृत्व कॅप्टन सतीश वासुदेव करत आहेत.

























































