तर इन्स्टाग्राम तुमचं अकाऊंट करणार डीलीट, नवीन धोरण जारी

865

इन्स्टाग्रामने सुरक्षेचा उपाय म्हणून एक नवीन धोरण लागू करणार आहे. यामुळे युजरचे अकाऊंट डीलीट होण्याची शक्यता आहे. पण तुमचं अकाऊंट खरं असेल आणि तुम्ही कुणाचेही फेक अकाऊंट चालवत नसेल तर तुम्हाला चिंता करण्याची बिल्कूल गरज नाही.

इन्स्टाग्राम फेक अकाऊंट्सला आळा घालण्यासाठी एक धोरण राबवणार आहे. ज्यानुसार इन्स्टाग्राम वापकर्त्यांना त्यांचे ओळखपत्र मागणार आहे. जर इन्स्टाग्राम युजरने आपले ओळखपत्र नाही दिले तर त्याचे इन्स्टाग्रामवरील रेटिंग कमी होऊ शकते तसेच युजरचे अकाऊंटीही डीलीट होऊ शकते. फेसबुकनेही अशा प्रकारे एक धोरण राबवले होते.

अनेक सेलिब्रिटी इन्स्टाग्रामचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. पण अनेक सेलिब्रीटींची सोशल मीडियावर फेक अकाऊंट आहे. याचा फटका सेलिब्रिटींना बसतो. इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर सारख्या कंपन्यांनी व्हेरिफाईड मार्कची व्यवस्था केली आहे, तरी अनेक फॉलोअर्स फेक अकाऊंट्सला फॉलो करतात. आता इन्स्टाग्राम आणि फेसबुक या अकाउटविरोधात मोर्चा उघडला आहे.

2016 च्या अमेरिका निवडणुकीत इन्स्टाग्रामचे हे एक प्रभावी माध्यम होते. आगामी निवडणुकीत इन्स्टाग्रामचा दुरुपयोग होऊ नये म्हणून कंपनीने हे धोरण राबवले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या