
इन्स्टाग्राम आपल्या युजर्ससाठी एक महत्त्वाचा बदल घेऊन येत आहे. आता इन्स्टाच्या होम स्क्रीनवर ‘पोस्ट’ ऐवजी ‘रिल’ दिसेल. म्हणजे जेव्हा तुम्ही इन्स्टाग्राम ‘ओपन’ कराल तेव्हा पहिल्यांदा रिल्स दिसतील. तीन अब्जाहून अधिक लोक दरमहा इन्स्टा अॅप वापरतात, असा अहवाल आहे. कंपनीचे म्हणणे आहे की त्याच्या जास्त वापराचे कारण रील्स आणि डीएम आहेत. नवीन चाचणीमध्ये, स्टोरीज अद्याप अॅपच्या टॉपला दिसतील, परंतु खाली स्क्रोल केल्यावर, युजर्सला पूर्ण स्क्रीनसह रील्स पाहायला मिळतील.