वैष्णोदेवीच्या भाविकांना 5 लाखांचा अपघाती विमा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, श्रीनगर

माता वैष्णोदेवीच्या भाविकांना आता पाच लाखांच्या अपघाती विम्याचे कवच मिळणार आहे. माता वैष्णोदेवी देवस्थान मंडळाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याआधी 3 लाखापर्यंत विनामूल्य अपघाती विमा 5 वर्षे व त्यापुढील वयोगटातील भाविकांना देण्यात येत होता. त्यात आता वाढ होऊन तो पाच लाख रुपयांपर्यंत करण्यात आला आहे.