
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने (सीएसएमआयए) टर्मिनल 2 जवळ ‘इंटिग्रेटेड सिक्युरिटी चेक पॉइंट’ सुरू केला आहे. सीएसएमआयएने तंत्रज्ञानाचे नवे मापदंड वापरत अभिनव संकल्पना राबवली आहे. यामुळे कामकाजाची वेळ वाचणार असून प्रवाशांचा ओघ आणि वर्दळ यांचे व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे होणार आहे. सीएसएमआयएने 13 एटीआरएस-रोलर आणि सेन्सरवर आधारित यंत्रे बसवली असून प्रवाशांनी सामान उचलल्यानंतर लगेज ट्रे पुन्हा एकदा मूळ जागी आणण्याचे काम ही यंत्रे स्वयंचलित पद्धतीने करतील. ही रिट्रीव्हल यंत्रणा दर तासाला सरासरी 350 सॅनिटाइझ्ड ट्रेज सर्क्युलेट करू शकते. यामुळे प्रवाशांच्या सामान तपासणीच्या प्रक्रियेला लागणारा वेळ कमी होणार असून या कामात प्रवासी किंवा कर्मचाऱयांचा प्रत्यक्ष हस्तक्षेपही होणार नाही.

























































