
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज देण्याच्या मुंबई बँकेच्या योजनेचा शुभारंभ आज करण्यात आला. क्यूआर कोड सुविधेच्या वितरणाची सुरुवातही यावेळी झाली. मुंबई बँकेच्या फोर्ट येथील मुख्य कार्यालयाच्या सभागृहात बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
बँकेच्या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना शून्य टक्के दराने 1 लाखापर्यंत कर्ज दिले जाणार आहे. याचा लाभ सुमारे 5 हजार भगिनींना होणार आहे. पहिल्या 200 लाडक्या बहिणींना यावेळी कर्जवाटप करण्यात आले. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, शिवाजीराव नलावडे, प्रसाद लाड, नंदकुमार काटकर, शिल्पा सरपोतदार, तेजस्विनी घोसाळकर, कविता देशमुख, संदीप घनदाट आदी उपस्थित होते.