नोव्हेंबरमध्येच रंगणार चौकार-षटकारांचा थरार; प्रसिद्ध T-20 लीगची घोषणा, MI चा संघ धमाका करणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संयुक्त अरब अमिरातीमधील आगामी टी-20 लीगच्या पाचव्या हंगामाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून यंदा ही स्पर्धा नेहमीपेक्षा लवकर सुरू होणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 लीगशी होणारा संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या संपूर्ण स्पर्धेत 34 सामने खेळवले जाणार असून दुबई, अबू धाबी आणि शारजाह या तीन शहरांमध्ये हे सामने पार पडतील. स्पर्धेचा महाअंतिम सोहळा दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर पार पडणार आहे.

लीगचे सीईओ डेव्हिड व्हाईट यांनी गेल्या हंगामाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला असून ब्रॉडकास्टिंग आकडेवारी आणि प्रेक्षकांचा वाढता कल पाहता या स्पर्धेची व्याप्ती वाढल्याचे त्यांनी सांगितले. यंदाच्या हंगामाचे खास वैशिष्ट्य म्हणजे सौदी अरेबिया आणि कुवेत क्रिकेट फेडरेशनसोबत करण्यात आलेली विशेष भागीदारी. या देशांमध्ये खेळाडूंच्या विकासासाठी खास स्पर्धांचे आयोजन केले जाणार असून, त्याद्वारे आखाती देशांमधील क्रिकेटची गुणवत्ता सुधारण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

या पाचव्या हंगामात डेझर्ट वायपर्स, गल्फ जायंट्स, MI एमिरेट्स, दुबई कॅपिटल्स, शारजाह वॉरियर्स आणि अबू धाबी नाईट रायडर्स हे सहा संघ मैदानात उतरणार असून, खेळाडूंच्या निवडीसाठी लवकरच लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. गेल्या हंगामात डेझर्ट वायपर्सने विजेतेपद पटकावले होते. या वर्षी देखील आंद्रे रसेल, निकोलस पूरन, सुनील नरेन आणि कीरॉन पोलार्ड यांसारखे जागतिक कीर्तीचे खेळाडू खेळणार असल्याने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या हंगामाची सुरुवात 22 नोव्हेंबरपासून होईल, तर अंतिम सामना 20 डिसेंबर रोजी खेळवला जाईल.