अलर्ट! मुलांसाठी फेसबुक-इन्स्टाग्राम असुरक्षित!! अमेरिकन कोर्टाचा ऐतिहासिक निकाल, मेटावर 3 हजार 141 कोटींचा दंड ठोठावला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे मुलांसाठी अत्यंत धोकादायक आहे, असा निर्वाळा अमेरिकेतील एका कोर्टाने दिला आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर सर्रासपणे अश्लील व्हिडीओ, पह्टो आणि चुकीच्या कामासाठी फूस लावणे, मानव तस्करीसारखा धोका अधिक बळावतो, असे कोर्टाने म्हटले आहे. ऑनलाईन धोक्यापासून मुलांना वाचवण्यात हे दोन्ही प्लॅटफॉर्म अपयशी ठरले आहेत, असे सांगत कोर्टाने मेटाला तब्बल 3 हजार 141 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

अमेरिकेतील न्यू मेक्सिकोच्या जुरीने हा निकाल दिला आहे. मेटाने प्लॅटफॉर्मच्या सुरक्षेबाबत ग्राहकांची दिशाभूल केली आणि राज्याच्या ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत मुलांना धोक्यात टाकले. ज्युरीने प्रत्येक उल्लंघनावर जास्तीत जास्त दंड आकारत एकूण 375 दशलक्ष डॉलर किंवा 3141 कोटी रुपयांच्या दंडाचा आदेश दिला आहे. या प्रकरणी तब्बल सात आठवडे कोर्टात खटला चालला, अखेर मेटाला दोषी ठरवत कोर्टाने हा दंड ठोठावला. अहवालानुसार, मेटाने आपल्या मागील तिमाहीत यापेक्षा 160 पट जास्त महसूल मिळवला होता. कोर्टाचा निकाल आल्यानंतर मेटाचीही या निकालावर प्रतिक्रिया आली आहे. कोर्टाच्या या निकालाविरोधात अपील करू, असे मेटाने म्हटले आहे.