इराणची क्षेपणास्त्र चाचणी; अमेरिका, युरोपही टप्प्यात; 10 हजार किमीपर्यंत हल्ला करण्याची क्षमता… मिसाईलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

इराणने संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. इराणने एका नवीन इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाईलची चाचणी केली आहे. या मिसाइलची मारक क्षमता तब्बल 10 हजार किलोमीटरपर्यंत असल्याचे सांगितले जात आहे. याचाच अर्थ हे क्षेपणास्त्र युरोपच्या मोठ्या भागात आणि अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी, न्यूयॉर्कपर्यंत मारा करू शकते. नुकत्याच जारी झालेल्या या रिपोर्टमध्ये म्हटले की, मिसाईलसंबंधी एक व्हिडीओ इराणी रिवोल्युशनरी गार्डस् कॉर्प्स (आयआरजीसी) च्या कमेंट्रीसोबत शेअर करण्यात आला आहे. यात मिसाईल, मोबाईल लॉन्चर आणि जुने टेस्ट फुटेज दाखवण्यात आले आहेत. या व्हिडीओनुसार, मिसाईल पूर्ण झाली असून सेवेसाठी तयार आहे. हा दावा करण्यात आला असला तरी याचा पुरावा अद्याप समोर आला नाही. तसेच या मिसाईलचा फोटो किंवा 10 हजार किमीपर्यंतचे टेस्ट फ्लाईटचा पुरावा मिळाला नाही.

सर्वाधिक धोका अमेरिकेला

जर या मिसाईलने खरोखर काम केले तर याचा परिणाम संपूर्ण जगाला भोगावा लागेल. सर्वात जास्त धोका हा अमेरिकेसाठी आहे. अमेरिकेकडे सध्या केवळ उत्तर कोरियासारख्या मर्यादित मिसाईलला रोखणारी डिफेन्स सिस्टम आहे. इराणच्या मिसाईलला रोखण्यासाठी अमेरिकेला अलास्का आणि कॅलिफोर्नियामध्ये नवीन इंटरसेप्टर लावावे लागतील. युरोपिय देशांना आपली मिसाईल अर्ली वॉर्निंग सिस्टम आणि डिफेन्स नेटवर्क मजबूत करावी लागतील.