Israel Attack on Gaza – इस्रायलचा गाझातील रुग्णालयावर हल्ला, 3 पत्रकारांसह 15 जणांचा मृत्यू

इस्रायलचे गाझावरील हल्ले थांबण्याचे नाव घेत नाहीत. गाझामधील मोठ्या रुग्णालयावर इस्रायलने एअरस्ट्राईक केला. या हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन पत्रकारांचा समावेश आहे. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. इस्रायली लष्कराने या हल्ल्याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, गाझातील नासेर रुग्णालयावर हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला, मुलांसह तीन पत्रकारांचा समावेश आहे. हल्ल्याची माहिती मिळताच बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. बचाव पथके पोहचताच दुसरा मिसाईल हल्ला करण्यात आल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.