
पश्चिम फिनलंडच्या युरा प्रदेशात शनिवारी दोन हेलिकॉप्टरची हवेत टक्कर झाल्याने भीषण अपघाताची घटना घडली. टक्कर झाल्यानंतर हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळले. फिनिश पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, या अपघातात अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा नेमका आकडा अद्याप समजू शकला नाही.
मेट्रो डॉट को यूकेने दिलेल्या माहितीनुसार, एकूण पाच जणांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर टक्कर झाल्यानंतर जमिनीवर कोसळले. अपघातात मृत झालेल्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.